Posts

स्टँड स्टील

Image
आज लाॅकडाऊनचा पहिला दिवस. खाटीक बाहेर सुरा परजत असताना खुराड्यातल्या कोंबडीची कशी अवस्था (अस्वस्थता) होत असेल, अगदी तसंच काहीसं वाटायला लागलं होतं. छातीत दुखतंय की काय? घशात कफ दाटला आहे की काय? अश्या नको त्या संवेदना उगाचच ठळकपणे जाणवू लागल्या. गेल्या पंधरा वीस दिवसांत अनेकांना मिळवलेले हात, खाल्लेले उष्टे पदार्थ, हात न धुता मिटक्या मारत हादडलेले रस्त्यावरील खाद्यपदार्थ सगळे एकजात डोळ्यासमोर नाचू लागले. विचारांचा डोक्यात एकच हलकल्लोळ माजला.  संपलं का जगणं? अरे, किती गोष्टी करायच्या राहिल्या आहेत. आपली बकेट लिस्ट आपल्याच बकोटीला मारून मध्यंतरालाच एक्झिट घ्यायची की काय? या आयुष्याचं ध्येय काय? जीवनाचा अर्थ काय? हा सगळा शोध कधी घ्यायचा? सगळंच संपणार घरात बसल्या बसल्या? हे सतत हॅपनिंग असलेले आयुष्य एकदम, अचानक स्टँड स्टील झालं.            कसं कोणास ठाऊक, हळूहळू हे कपातलं वादळ शमलं आणि मन पहाटेच्या तलावासारखं स्थिर, नितळ झालं. कित्येक वर्षात न एेकलेली चिमण्यांची चिवचिव ऐकली. स्वच्छ सुर्यप्रकाश पाहिला. झाडांचा हिरवाकंच रंग डोळ्यांना आणि मनाला गारवा देऊन गेला. भोवताल एच् डी क्वाल

मॅराथॉन

Image
आज घरात बसून तसा मला दिड आठवडा झाला. तसंही दैनंदिन जीवनात व्यायाम हा प्रकार सोडून बराच काळ झाल्यासारखं वाटतं होतं. पृथ्वी जशी तिच्या स्थिर अक्षाभोवती गतिमान असते, तसं आजच्या वर्तमानामध्ये स्थिर झालेल्या मेंदू भोवती भूतकाळाच्या धावत्या आठवणी रूंजी घालू लागल्या. भागे रे मन, कहीं लागे रे मन, चला जा ने किधर जानू ना... असं म्हणत, माझ्या मनाने चार वर्षांपूर्वी पुर्ण केलेली पहिली पहिली मॅरॅथॉन गाठली. मॅरेथॉन एक व्यायाम प्रकार, तो कसा एखाद्या ललित लेखाचा विषय होऊ शकतो? पण, माझ्यासाठी नक्कीच होऊ शकतो. आयुष्य आनंदाने भरून टाकणारी, नव्याने जगणं शिकवणारी कोणतीही गोष्ट माझ्या लिखाणाचा भाग होऊ शकते.        मॅरॅथॉन.... एक विलक्षण अनुभव.  धावणे म्हणजे व्यायामाच्याही पलिकडे जाऊन एक वेगळी अनुभूती होती माझ्यासाठी. मॅरॅथॉनचा रोजचा सराव म्हणजे ऊर फोडणाऱ्या  आयुष्याच्या शर्यतीत मला मिळालेला विसावा. ह्या सरावाने मला निसर्गाच्या अगदी जवळ आणले. मला निसर्गाचा भाग असल्याची जाणीव करून दिली. विविध रूपांनी ही मॅरेथॉन माझ्या आयुष्याला स्पर्शून गेली.  मॅरेथॉन म्हणजे गाण्याची मैफल.पहाटेची शांत नीरव वेळ, झ

सहल आणि प्रवास

Image
आज पहाटे चिन्मय सहलीला निघाला.  पहाटेची शिरशिरी आणणारी थंडी, रस्त्याच्या दोन्हीही बाजूला पसरलेल्या शेतांवर पसरलेली धुक्याची साय, मनाच्या त्वचेला वेगळीच तुकतुकी अाणतं होती. शाळेत पोहोचलो. सहलीसाठी आणलेल्या बसची फुरफुर, काकध्वनी, कोकिळेची कुहूकुहू, सहलीला आतुर झालेल्या मुलांचा उत्साहपूर्ण चिवचिवाट, मला वेगळ्याच विश्वात घेऊन गेले. क्षणभर मनात आलं, या आॅफीसच्या फाॅर्मल कपड्यातून आत मनात खोलपर्यंत मूळ पसरलेला ऒपचारिकतेचा मळ मुळापासून उपटून टाकावा आणि खरी युनिफॉर्मिटी (समानता) निर्माण करणारा युनिफॉर्म घालून त्या मुलांच्या रांगेत घुसावं. मोकळं व्हावं. बंधनातलं खरं मुक्तपण जगावं.  पण, हे असं फक्त कथा, कादंबऱ्या, चित्रपटांत आणि मनातच होणं शक्य आहे. वास्तवात, चिन्मयला त्याच्या आईबरोबर शाळेत सोडून, निदान मला मन तरी दिलंस म्हणून देवाचे आभार मानत स्टेशनच्या दिशेने  निघालो. तिकडे सगळी मुलं आनंदाने, जीवनारसाने ओथंबलेल्या मनाने मुक्तपणे धावत होती आणि इकडे मी, निघालो होतो दॆनंदिन जीवनाच्या शर्यतीत (rat race) ऊर फुटेस्तोवर धावायला.

जीवनातला क्ष/ x - देव

Image
मला जर कोणी विचारलं की देव खरंच आहे का? तर मी हसून सांगतो, " नाही. देव अस्तित्वात नाही, हे सत्य आहे. पण, मी मात्र देवाला मानतो." काय बुचकळ्यात पडलात ना? सांगतो, सगळं सविस्तर सांगतो.  गोष्ट तशी जुनी आहे, पाच सहा वर्षापूर्वीची असेल कदाचित. मालवण देऊळवाड्यातल्या रामेश्वर मंदिरासमोरच्या आमच्या घरात दुपारच्या जेवणानंतर, मी झोपाळ्यावर हळुवार झोके घेत बसलो होतो. मध्यान्हीची वेळ. शांत, निशब्द, स्टँड स्टील. रामेश्वराच्या देवळाकडे पहाता पहाता अनेक विचार मनात दाटून आले होते. देव खरंच अस्तित्वात आहे का? असेल तर तो मुर्त आहे की अमुर्त? का नुसतीच एक अनुभूती?         तसं पाहिलं तर माझा जन्म देव भोळ्या कुटूंबातील. माझं सगळं बालपण भजन, किर्तन, पुराणकथा, अनुभव कथा श्रवण, संत चरित्र वाचन ह्यात गेलं. हे सगळं मनोभावे करता करता देखील मनात अनेक प्रश्न निर्माण झाले व समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने अनुत्तरितच राहिले. त्या प्रश्नांची उत्तरे शोधतांना कधी मी  निरीश्वरवादाकडे वळलो ते माझे मलाच कळले नाही. तरी मनापासून कुठे तरी देव असावा आणि तो मला भेटावा अशी इच्छा होतीच. पण, कल्पना व वास्तव ह्

धर्म

Image
आज फेसबुक चाळत असताना प्रकर्षाने जाणवलं की, ह्या करोनोने फक्त माणसांनाच नव्हे, तर राजकारण, धर्म या (जीवनावश्यक) विषयांना पण सळो की पळो करून सोडले. इथे धर्म म्हणजे Religion बरं का. जगात निर्माण झालेली सगळी अराजकता, जनमानसात असलेला सगळा विद्वेष ह्याच कारण हाच धर्म (Religion),आज तो कुठेही नावाला दिसत नाही.         आजच्या रविवारच्या सकाळी शांत पहुडलो होतो. लहानपणापासून पाहिलेल्या, वाचलेल्या, अनुभवलेल्या विचारांची मनात एकच गर्दी झाली आणि माझ्या लेखाचा विषय ठरला - धर्म, खरा धर्म. माझ्या मते Religion म्हणजे खरा धर्म नव्हेच. कदाचित Religion ला पर्यायी शब्द मिळाला नसेल तेव्हा... 'मराठा तितुका मेळवावा' ह्या चित्रपटामधील 'शूर आम्ही सरदार' ह्या गाण्यातील देव, देश अन् धर्मापायी या ओळीने, मला जाणीव करून दिली की देव व धर्म ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आचारविचार, भेदाभेद ह्या शब्दांप्रमाणेच 'देवधर्म' हा एक शब्द. मुळात वेगवेगळे असे हे भिन्न विषय कधी व कसे एकरूप झाले असतील हे कोडेच होते माझ्या समोर. कोणत्याही गोष्टीचा विज्ञानाधिष्ठित व विवेकशील प्रश्नांनी शोध घ्या