पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जीवनातला क्ष/ x - देव

इमेज
                    मला जर कोणी विचारलं की देव खरंच आहे का? तर मी हसून सांगतो, " नाही. देव अस्तित्वात नाही, हे सत्य आहे. पण, मी मात्र देवाला मानतो." काय बुचकळ्यात पडलात ना? सांगतो, सगळं सविस्तर सांगतो.                      गोष्ट तशी जुनी आहे, पाच सहा वर्षापूर्वीची असेल कदाचित. मालवण देऊळवाड्यातल्या रामेश्वर मंदिरासमोरच्या आमच्या घरात दुपारच्या जेवणानंतर, मी झोपाळ्यावर हळुवार झोके घेत बसलो होतो. मध्यान्हीची वेळ. शांत, निशब्द, स्टँड स्टील. रामेश्वराच्या देवळाकडे पहाता पहाता अनेक विचार मनात दाटून आले होते. देव खरंच अस्तित्वात आहे का? असेल तर तो मुर्त आहे की अमुर्त? का नुसतीच एक अनुभूती?                                        तसं पाहिलं तर माझा जन्म देव भोळ्या कुटूंबातील. माझं सगळं बालपण भजन, किर्तन, पुराणकथा, अनुभव कथा श्रवण, संत चरित्र वाचन ...

धर्म

इमेज
                         आज फेसबुक चाळत असताना प्रकर्षाने जाणवलं की, ह्या करोनोने फक्त माणसांनाच नव्हे, तर राजकारण, धर्म या (जीवनावश्यक) विषयांना पण सळो की पळो करून सोडले. इथे धर्म म्हणजे Religion बरं का. जगात निर्माण झालेली सगळी अराजकता, जनमानसात असलेला सगळा विद्वेष ह्याच कारण हाच धर्म (Religion),आज तो कुठेही नावाला दिसत नाही.                                             आजच्या रविवारच्या सकाळी शांत पहुडलो होतो. लहानपणापासून पाहिलेल्या, वाचलेल्या, अनुभवलेल्या विचारांची मनात एकच गर्दी झाली आणि माझ्या लेखाचा विषय ठरला - धर्म, खरा धर्म. माझ्या मते Religion म्हणजे खरा धर्म नव्हेच. कदाचित Religion ला पर्यायी शब्द मिळाला नसेल तेव्हा... 'मराठा तितुका मेळवावा' ह्या चित्रपटामधील 'शूर आम्ही सरदार' ह्या गाण्यातील देव, देश अन् धर्मापायी या ओळीने, मला जाणीव करून दिली की देव व धर्म ह्या ...