हृदय कथा: फिरूनी नवा जन्मेन मी
3 ऑक्टोबर २०२५. खरच एक अविस्मरणीय दिवस. अतिशय आगळावेगळा दिवस. हृदयविकाराच्या झटक्याने भूत आणि भविष्याच्या हिंदोळ्यावरून झटकन मला वर्तमानाच्या जमिनीवर अलगद आणून ठेवलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता. मला वाटलं होतं की, अशा क्षणी मी हादरून जाईन. पण, एक अनामिक, अनोळखी शांती मनात विलसत होती. For a change, मनात कसलेच विचार नव्हते. आजूबाजूची माणसं, स्वतःच्या शरीर, हृदय हे सर्व मी निर्वीकल्प व कुठल्याही प्रतिमेच्या आहारी न जाता अनुभवत होतो. परमशांती, मुक्ती, मोक्ष जे काय म्हणतात ते हेच असेल का? मनात विचार आला, ‘ज्यासाठी केला अट्टाहास’ ते सर्व काहीही न करता इथे वर्तमानात उपस्थित होते..पूर्वीपासूनच. उपस्थित नव्हतो तो मी. आणि आज अचानक या एका झटक्यासारखी सर्व एकदम स्वच्छ दिसू लागले. ब्रह्मानंद स्वामींचं , ‘क्या पानी मे, मलमल न्हावे | मनके मैल उतार पिया रे ||’ किंवा, ‘अपने को भूल तनमे, बाहिर फिरे गवारा.’ याचा अर्थ अचानक असा दृष्टोत्पत्तीस आला. भल्या भल्यांना तप करून जे उमगत नाही, ते या जन्ममरणाच्या हिंदोळ्यामध्ये पटकन मनात प्रकाशित झालं. It is so simpl...