पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हृदय कथा: फिरूनी नवा जन्मेन मी

इमेज
  3 ऑक्टोबर २०२५. खरच एक अविस्मरणीय दिवस. अतिशय आगळावेगळा दिवस. हृदयविकाराच्या झटक्याने भूत आणि भविष्याच्या हिंदोळ्यावरून झटकन मला वर्तमानाच्या जमिनीवर अलगद आणून ठेवलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता. मला वाटलं होतं की, अशा क्षणी मी हादरून जाईन. पण, एक अनामिक, अनोळखी शांती मनात विलसत होती.  For a change, मनात कसलेच विचार नव्हते. आजूबाजूची माणसं, स्वतःच्या शरीर, हृदय  हे सर्व मी निर्वीकल्प व कुठल्याही प्रतिमेच्या आहारी न जाता अनुभवत होतो. परमशांती, मुक्ती, मोक्ष जे काय म्हणतात ते हेच असेल का? मनात विचार आला, ‘ज्यासाठी केला अट्टाहास’ ते सर्व काहीही न करता इथे वर्तमानात उपस्थित होते..पूर्वीपासूनच. उपस्थित नव्हतो तो मी. आणि आज अचानक या एका झटक्यासारखी सर्व एकदम स्वच्छ दिसू लागले. ब्रह्मानंद स्वामींचं , ‘क्या पानी मे, मलमल न्हावे | मनके मैल उतार पिया रे ||’ किंवा, ‘अपने को भूल तनमे, बाहिर फिरे गवारा.’ याचा अर्थ अचानक असा दृष्टोत्पत्तीस आला. भल्या भल्यांना तप करून जे उमगत नाही, ते या जन्ममरणाच्या हिंदोळ्यामध्ये पटकन मनात प्रकाशित झालं. It is so simpl...

हृदय कथा: क्षण एक पुरे प्रेमाचा

इमेज
         3 ऑक्टोबर 2025 - मृत्यूच्या दरवाज्यावर धप्पा करून मी मागे वळलो होतो. खरं सांगू तर बरेच दिवसापासून स्वतःला एकाकी एकटा समजत होतो पण मरणाच्या दारातून प्रेमाचं विश्‍व अगदी सुस्पष्ट दिसू लागलं. ते दर्शन इतकं विलोभनीय आणि भावस्पर्शी होतं की मी त्यात गुंगून माझा हृदयरोग ही विसरून गेलो.               पहाटे हॉस्पिटल ला आयसीयू मध्ये दाखल झाल्यापासून माझी एनजीओप्लास्टी होईस्तोपर्यंत माझ्या हृदयाला धडधडत ठेवण्याचं काम माझ्या सहचारिणीच्या - प्राचीच्या शब्दांनी केलं होतं. भावनावेगात ती मला म्हणाली होती "काहीही कर. पण, मरू नकोस." ते शब्द माझ्या आणि मृत्यूच्या मध्ये बाजीप्रभू देशपांडे सारखे गच्च पाय रोवून उभे होते. त्या शब्दांनीच मला बळ दिलं होतं. माझा मुलगा चिन्मय सतत I.C.U.च्या दरवाजातून मला भेटण्यासाठी डोकावत होता. तो जेव्हा मला भेटायला आला तेव्हा त्याच्या डोळ्यात मला माझ्याविषयीचा अभिमान, अधीरता, व्याकुळता, प्रेम हे सगळं एकवटलेलं  दिसत होतं. स्वतः तापाने फणफणलेला असतानाही मला भेटायला ...

हृदय कथा: पराधीन आहे जगती

इमेज
3 ऑक्टोबर 2025 - माझ्या जीवनातला अविस्मरणीय दिवस. आयुष्यातल्या जीवनाचं महत्त्व मनावर ठसवणारा दिवस.  मला सौम्य (?)  हृदयविकाराचा झटका आला आणि माझे स्वतःबद्दलचे सगळे अहंगंडाचे, चिरंजीवत्त्वाचे, स्वप्नांचे भ्रम एका झटक्यात धुळीला मिळवून खाडकन मला वास्तवाच्या दुनियेत घेऊन आला.  पहाटे तीन ते दुपारी साडेबारापर्यंतचा काळ हा असा काळ होता जेव्हा मी माझ्या 46 वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदा वर्तमानात जगत होतो.  एक  एक गोष्ट  टिपत होतो.  एक एक एक हृदयाचा ठोका अनुभवत होतो.  तरुण पोरांना आव्हान  देत, दुनिया हिला देंगे हम च्या थाटात तीन चार तास बेधुंद होऊन नाचू शकणार मी, I.C.U. मधल्या बिछान्यावर पापणी हलवली तरी हृदयाचा ठोका बंद पडेल या विचाराने अगदी निश्चल पडून होतो. स्वतःला घराचा पोशिंदा समजणारा मी, रंगमंचावर विविध व्यक्तीरेखांसाठी आपल्या शारीरिक अंगांचा अगदी सहजगत्या ताबा घेऊ शकणारा नट (?), बऱ्यापैकी मॅरेथॉन धावू शकणारा मी, स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार समजणारा मी, कर्तुत्ववान मी, आज हगण्या-मुतण्यासाठी इस्पितळातील स्वच्छता कर्मचाऱ्यांवर आणि आयुष्याच्या पुढ...