पोस्ट्स

2023 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सहल आणि प्रवास

इमेज
                         आज पहाटे चिन्मय सहलीला निघाला.  पहाटेची शिरशिरी आणणारी थंडी, रस्त्याच्या दोन्हीही बाजूला पसरलेल्या शेतांवर पसरलेली धुक्याची साय, मनाच्या त्वचेला वेगळीच तुकतुकी अाणतं होती.                          शाळेत पोहोचलो. सहलीसाठी आणलेल्या बसची फुरफुर, काकध्वनी, कोकिळेची कुहूकुहू, सहलीला आतुर झालेल्या मुलांचा उत्साहपूर्ण चिवचिवाट, मला वेगळ्याच विश्वात घेऊन गेले. क्षणभर मनात आलं, या आॅफीसच्या फाॅर्मल कपड्यातून आत मनात खोलपर्यंत मूळ पसरलेला ऒपचारिकतेचा मळ मुळापासून उपटून टाकावा आणि खरी युनिफॉर्मिटी (समानता) निर्माण करणारा युनिफॉर्म घालून त्या मुलांच्या रांगेत घुसावं. मोकळं व्हावं. बंधनातलं खरं मुक्तपण जगावं.                           पण, हे असं फक्त कथा, कादंबऱ्या, चित्रपटांत आणि मनातच होणं शक्य आहे. वास्तवात, चिन्मयला त्याच्या आईब...

स्टँड स्टील

इमेज
                              आज लाॅकडाऊनचा पहिला दिवस. खाटीक बाहेर सुरा परजत असताना खुराड्यातल्या कोंबडीची कशी अवस्था (अस्वस्थता) होत असेल, अगदी तसंच काहीसं वाटायला लागलं होतं. छातीत दुखतंय की काय? घशात कफ दाटला आहे की काय? अश्या नको त्या संवेदना उगाचच ठळकपणे जाणवू लागल्या. गेल्या पंधरा वीस दिवसांत अनेकांना मिळवलेले हात, खाल्लेले उष्टे पदार्थ, हात न धुता मिटक्या मारत हादडलेले रस्त्यावरील खाद्यपदार्थ सगळे एकजात डोळ्यासमोर नाचू लागले. विचारांचा डोक्यात एकच हलकल्लोळ माजला.  संपलं का जगणं? अरे, किती गोष्टी करायच्या राहिल्या आहेत. आपली बकेट लिस्ट आपल्याच बकोटीला मारून मध्यंतरालाच एक्झिट घ्यायची की काय? या आयुष्याचं ध्येय काय? जीवनाचा अर्थ काय? हा सगळा शोध कधी घ्यायचा? सगळंच संपणार घरात बसल्या बसल्या? हे सतत हॅपनिंग असलेले आयुष्य एकदम, अचानक स्टँड स्टील झालं.                           कसं कोणास ठाऊक, हळूहळू हे कप...

मॅराथॉन

इमेज
                              आज घरात बसून तसा मला दिड आठवडा झाला. तसंही दैनंदिन जीवनात व्यायाम हा प्रकार सोडून बराच काळ झाल्यासारखं वाटतं होतं. पृथ्वी जशी तिच्या स्थिर अक्षाभोवती गतिमान असते, तसं आजच्या वर्तमानामध्ये स्थिर झालेल्या मेंदू भोवती भूतकाळाच्या धावत्या आठवणी रूंजी घालू लागल्या. भागे रे मन, कहीं लागे रे मन, चला जा ने किधर जानू ना... असं म्हणत, माझ्या मनाने चार वर्षांपूर्वी पुर्ण केलेली पहिली पहिली मॅरॅथॉन गाठली. मॅरेथॉन एक व्यायाम प्रकार, तो कसा एखाद्या ललित लेखाचा विषय होऊ शकतो? पण, माझ्यासाठी नक्कीच होऊ शकतो. आयुष्य आनंदाने भरून टाकणारी, नव्याने जगणं शिकवणारी कोणतीही गोष्ट माझ्या लिखाणाचा भाग होऊ शकते.                            मॅरॅथॉन.... एक विलक्षण अनुभव.  धावणे म्हणजे व्यायामाच्याही पलिकडे जाऊन एक वेगळी अनुभूती होती माझ्यासाठी. मॅरॅथॉनचा रोजचा सराव म्हणजे ऊर फोडणाऱ्या  आयुष्याच्या...