सहल आणि प्रवास


                    आज पहाटे चिन्मय सहलीला निघाला.  पहाटेची शिरशिरी आणणारी थंडी, रस्त्याच्या दोन्हीही बाजूला पसरलेल्या शेतांवर पसरलेली धुक्याची साय, मनाच्या त्वचेला वेगळीच तुकतुकी अाणतं होती.

                    शाळेत पोहोचलो. सहलीसाठी आणलेल्या बसची फुरफुर, काकध्वनी, कोकिळेची कुहूकुहू, सहलीला आतुर झालेल्या मुलांचा उत्साहपूर्ण चिवचिवाट, मला वेगळ्याच विश्वात घेऊन गेले. क्षणभर मनात आलं, या आॅफीसच्या फाॅर्मल कपड्यातून आत मनात खोलपर्यंत मूळ पसरलेला ऒपचारिकतेचा मळ मुळापासून उपटून टाकावा आणि खरी युनिफॉर्मिटी (समानता) निर्माण करणारा युनिफॉर्म घालून त्या मुलांच्या रांगेत घुसावं. मोकळं व्हावं. बंधनातलं खरं मुक्तपण जगावं. 

                    पण, हे असं फक्त कथा, कादंबऱ्या, चित्रपटांत आणि मनातच होणं शक्य आहे. वास्तवात, चिन्मयला त्याच्या आईबरोबर शाळेत सोडून, निदान मला मन तरी दिलंस म्हणून देवाचे आभार मानत स्टेशनच्या दिशेने  निघालो.
तिकडे सगळी मुलं आनंदाने, जीवनारसाने ओथंबलेल्या मनाने मुक्तपणे धावत होती आणि इकडे मी, निघालो होतो दॆनंदिन जीवनाच्या शर्यतीत (rat race) ऊर फुटेस्तोवर धावायला.

टिप्पण्या

अथांग म्हणाले…
खूप खूप धन्यवाद कृपया इतरांनाही हे शेअर करा
निनावी म्हणाले…
Nostalgia, khup chaan!
निनावी म्हणाले…
खूपच छान दादा 👌🏻
निनावी म्हणाले…
खूपच छान दादा 👌🏻
निनावी म्हणाले…
खुप छान

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हृदय कथा: पराधीन आहे जगती

हृदय कथा: क्षण एक पुरे प्रेमाचा

हृदय कथा: फिरूनी नवा जन्मेन मी