मला वृद्ध व्हायचंय.
ज्या वयात प्रश्न पडायचे (म्हणजे बालपण), त्या वयाला कधीच मागे टाकून ज्या वयात प्रश्न उभे राहतात त्या वयात (म्हणजे मध्यमवयीन वयात) मी माझं व्यवस्थित बस्तान मांडून निवांत झाल्यावर एक जुनाच प्रश्न स्वतःला विचारला. तुला कोण व्हायचंय, बालक, तरुण की वृद्ध? आणि आतून उत्तर आलं..मला वृद्ध व्हायचंय. गोंधळात ना? मला खरंच वृद्ध व्हायचंय. पण, वृद्ध म्हणजे म्हातारा नवे बरंका! नाही कळलं? चला, मग जरा सविस्तर सांगतो. उत्क्रांतीवादातील प्रसिद्ध वाक्प्रचार आहे, Survival of the fittest. शरीर कमकुवत होऊन त्याचा अंत होणे म्हणजे म्हातारपण. पण त्याबरोबरच ऊर्जेचा एक नियम आहे. ऊर्जा कधीही नष्ट होत नाही तर, ती रूपांतरित (Transform) होते. अगदी तसंच आयुष्यभराच्या अनुभवाचं सुदृढ व्यक्तिमत्त्वात आणि सकस ज्ञानात ट्रान्सफॉर्मेशन होणं म्हणजे वृद्धत्व . महत्त्वाचं हे आहे की, मनाने आपण काय निवडतो म्हातारपण की वृद्धत्...