मला वृद्ध व्हायचंय.

          


         

            ज्या वयात प्रश्न पडायचे (म्हणजे बालपण), त्या वयाला कधीच मागे टाकून ज्या वयात प्रश्न उभे राहतात त्या वयात (म्हणजे मध्यमवयीन वयात) मी माझं व्यवस्थित बस्तान मांडून निवांत झाल्यावर एक जुनाच प्रश्न स्वतःला विचारला. तुला कोण व्हायचंय, बालक, तरुण की वृद्ध? आणि आतून उत्तर आलं..मला वृद्ध व्हायचंय. गोंधळात ना? मला खरंच वृद्ध व्हायचंय. पण, वृद्ध म्हणजे म्हातारा नवे बरंका!

         नाही कळलं? चला, मग जरा सविस्तर सांगतो. उत्क्रांतीवादातील प्रसिद्ध वाक्प्रचार आहे, Survival of the fittest. शरीर कमकुवत होऊन त्याचा अंत होणे म्हणजे म्हातारपण. पण त्याबरोबरच ऊर्जेचा एक नियम आहे. ऊर्जा कधीही नष्ट होत नाही तर, ती रूपांतरित (Transform) होते. अगदी तसंच आयुष्यभराच्या अनुभवाचं सुदृढ व्यक्तिमत्त्वात आणि सकस ज्ञानात ट्रान्सफॉर्मेशन होणं म्हणजे वृद्धत्व

         महत्त्वाचं हे आहे की, मनाने आपण काय निवडतो म्हातारपण की वृद्धत्व? जमिनीवर पडून कुसलेली कैरी, म्हणजे म्हातारपण. तर, लोणच्याच्या रूपाने मुरलेली कैरी, म्हणजे वृद्धत्व. संध्याकाळी मावळत चाललेला सूर्य, म्हणजे म्हातारपण. तर, क्षितिजावर विविध रंगांची उधळण करत उल्हासित करणारा संध्याछायेचा खेळ म्हणजे वृद्धत्व. दुसऱ्याच्या आधारावर जगणारी वेल म्हणजे म्हातारपण. तर, शतकानुशतक आसरा देणारा - वटवृक्ष म्हणजे वृद्धत्व. सतत काही ना काही मागतं, ते म्हातारपण आणि सदैव देण्यासाठी उत्सुक असतं, ते वृद्धत्व.

          वृद्ध या शब्दाचा शब्दकोशीय अर्थ आहे, पूर्ण विकास पावलेला. अश्या अनेक पूर्ण विकास पावलेल्या व्यक्ती माझ्या आसपास आहेत. वयाच्या सत्तरीत विविध समाजोपयोगी उपक्रम करणारे सामंत दांपत्य. वयाच्या पंचाहत्तरीत भरतनाट्यम शिकणाऱ्या सुजाता महाजन. तंत्रज्ञानाला आपलंसं करून आपल्यासारख्या ज्येष्ठच नव्हे तर आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या साहित्य प्रेमींना देखील एकत्र आणणारे, नानासाहेब सहस्त्रबुद्धे. वयाच्या 75 व्या वर्षी पहिल्यांदा हातात कुंचला घेऊन चित्र रेखाटनाला सुरुवात करणाऱ्या सुप्रिया घाणेकर. ही अगदी जवळची उदाहरण. वयाच्या 85 व्या वर्षी चित्रपटात तरुणाच्या उत्साहाने काम करणारा अमिताभ काय किंवा मॅरेथॉन मध्ये धावणारे अनेक अनामिक भीष्माचार्य काय? सगळेच भारावून टाकणारे. यांना पाहिलं की वाटतं, वृद्ध हा शब्द समृद्ध या शब्दाचा पर्यायवाची शब्द असायला हवा

          अर्थात भूतकाळ (बाल्य आणि काहींचे तारुण्य) आपल्या हातात नाही. पण, भविष्यकाळ नक्कीच आपल्या हातात आहे, ज्याचा मार्ग वर्तमानातून जातो. आता हे सगळं वाचल्यावर तुम्हीच ठरवा, तुम्हाला काय व्हायचंय. आयुष्यभराच्या अनुभवाचा प्रकाश असून देखील त्यात चाचपडणारा एक मूकबधिर अंध म्हातारा की, स्वानुभवातून अतिशय पराकाष्ठेने आपल्या ज्ञानाचा इवलासा दिवा पेटवून आपला आसपास उजळवून टाकणारा वृद्ध. मी मात्र ठरवलं आहे. आपण समृद्ध व्हायचंय... वृद्ध व्हायचंय. ज्ञानवृद्ध, कार्यवृद्ध. 

- सागर रानडे

टिप्पण्या

Sumant Juvekar म्हणाले…
आत्ताच वाचला. ज्ञानवृद्ध कार्य वृद्ध . 👍👌👌चांगली कल्पना, अप्रतिम लेखन, सागर🙋‍♂️👍👌🌈🌈💐👌👌
Kishor Chaudhari म्हणाले…
फारच सुंदर लिहिलं आहे
निनावी म्हणाले…
वा सुंदर
निनावी म्हणाले…
वा सागर दा
निनावी म्हणाले…
खूप छान विचार आणि चागली कल्पना आहे...सागर
अथांग म्हणाले…
Thank you. Aapan naav share karal tar bara hoil.
अथांग म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
निनावी म्हणाले…
खूप छान विचार आणि चांगली कल्पना आहे...सागर
Makarand म्हणाले…
Khupach jabardast ....mala hi vrudha vhayacha aahe...hya kshanapaasun
अथांग म्हणाले…
❤️💕Lihinayacha sarthak zala. It means a lot makya...
निनावी म्हणाले…
खूपच सुंदर विचार, सकारात्मक दृष्टिकोन मिळाला थँक यु सागर दादा माझ्या प्रश्नचं उत्तर ही मिळालं लेखातून 👍🏽👍🏽
हेमंत मराठे म्हणाले…
वृध्दत्व व म्हातारपण यांतील फरक उत्तम शब्दांत मांडला आहे. असाच लिहिता रहा
निनावी म्हणाले…
खूप छान
निनावी म्हणाले…
खुप विचार करायला लावेल अस लिहिलं आहे...खूप छान
निनावी म्हणाले…
Khup chaan !
-Mayur
अथांग म्हणाले…
धन्यवाद हेमंत काका तुमचे आशीर्वाद असू द्या.
अथांग म्हणाले…
याहून आनंदासारखं दुसरं काही नाही. खूप धन्यवाद. तुझं नाव कळेल का?
राkesh Chavan. म्हणाले…
वृध्दत्व व म्हातारपण यांतील फरक फक्त आपल्या मनावरती आहे. आपलं मन थकलं की नक्कीच आपण शरीराने थकून जाऊ. खूप छान मित्रा. ❣️
अथांग म्हणाले…
खूप खूप धन्यवाद, मित्रा.
Vivek Thakur म्हणाले…
खूप सुंदर विचार आणि लिखाण.
अथांग म्हणाले…
Vivek, tuzyasarkha niyamait vachanara wachak milala.. Jababadari wadali ahe aata.
Sanjeev Bhamre म्हणाले…
छान ! समृद्ध वृद्धत्व👌..Aged like a fine wine.
निनावी म्हणाले…
Wahh kammal lihilay..🙌
Atul Torne म्हणाले…
सुंदर, अतिसुंदर.... शांता शेळके यांची आठवण झाली...

..जे निरभ्र असते ते आकाश..
आणि..
..जे भरून येते ते आभाळ..!!


तसेच तुझ्या मुळे म्हातारपण आणि वृध्दत्व यातला फरक समजला....

असाच इथे भेटत रहा 🙂
अथांग म्हणाले…
Atul, I must say that, you are very sensitive person deep inside. Var disat nahi te. Pan te ahe. Thanks a lot.
Shivahari Ranade म्हणाले…
अतिशय सुंदर अर्थ वृद्ध शब्दाचा , क्या बात है , माझा भाऊ म्हणून म्हणत नाही पण मी तुला स्वानुभवातून जगताना लिहिताना आणि शिकताना बघितलंय so hatz off to you

अप्रतिम लेखन❤️❤️❤️

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मनकथा - Connection

हृदय कथा: पराधीन आहे जगती

हृदय कथा: क्षण एक पुरे प्रेमाचा