पोस्ट्स

2025 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हृदय कथा: फिरूनी नवा जन्मेन मी

इमेज
  3 ऑक्टोबर २०२५. खरच एक अविस्मरणीय दिवस. अतिशय आगळावेगळा दिवस. हृदयविकाराच्या झटक्याने भूत आणि भविष्याच्या हिंदोळ्यावरून झटकन मला वर्तमानाच्या जमिनीवर अलगद आणून ठेवलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता. मला वाटलं होतं की, अशा क्षणी मी हादरून जाईन. पण, एक अनामिक, अनोळखी शांती मनात विलसत होती.  For a change, मनात कसलेच विचार नव्हते. आजूबाजूची माणसं, स्वतःच्या शरीर, हृदय  हे सर्व मी निर्वीकल्प व कुठल्याही प्रतिमेच्या आहारी न जाता अनुभवत होतो. परमशांती, मुक्ती, मोक्ष जे काय म्हणतात ते हेच असेल का? मनात विचार आला, ‘ज्यासाठी केला अट्टाहास’ ते सर्व काहीही न करता इथे वर्तमानात उपस्थित होते..पूर्वीपासूनच. उपस्थित नव्हतो तो मी. आणि आज अचानक या एका झटक्यासारखी सर्व एकदम स्वच्छ दिसू लागले. ब्रह्मानंद स्वामींचं , ‘क्या पानी मे, मलमल न्हावे | मनके मैल उतार पिया रे ||’ किंवा, ‘अपने को भूल तनमे, बाहिर फिरे गवारा.’ याचा अर्थ अचानक असा दृष्टोत्पत्तीस आला. भल्या भल्यांना तप करून जे उमगत नाही, ते या जन्ममरणाच्या हिंदोळ्यामध्ये पटकन मनात प्रकाशित झालं. It is so simpl...

हृदय कथा: क्षण एक पुरे प्रेमाचा

इमेज
         3 ऑक्टोबर 2025 - मृत्यूच्या दरवाज्यावर धप्पा करून मी मागे वळलो होतो. खरं सांगू तर बरेच दिवसापासून स्वतःला एकाकी एकटा समजत होतो पण मरणाच्या दारातून प्रेमाचं विश्‍व अगदी सुस्पष्ट दिसू लागलं. ते दर्शन इतकं विलोभनीय आणि भावस्पर्शी होतं की मी त्यात गुंगून माझा हृदयरोग ही विसरून गेलो.               पहाटे हॉस्पिटल ला आयसीयू मध्ये दाखल झाल्यापासून माझी एनजीओप्लास्टी होईस्तोपर्यंत माझ्या हृदयाला धडधडत ठेवण्याचं काम माझ्या सहचारिणीच्या - प्राचीच्या शब्दांनी केलं होतं. भावनावेगात ती मला म्हणाली होती "काहीही कर. पण, मरू नकोस." ते शब्द माझ्या आणि मृत्यूच्या मध्ये बाजीप्रभू देशपांडे सारखे गच्च पाय रोवून उभे होते. त्या शब्दांनीच मला बळ दिलं होतं. माझा मुलगा चिन्मय सतत I.C.U.च्या दरवाजातून मला भेटण्यासाठी डोकावत होता. तो जेव्हा मला भेटायला आला तेव्हा त्याच्या डोळ्यात मला माझ्याविषयीचा अभिमान, अधीरता, व्याकुळता, प्रेम हे सगळं एकवटलेलं  दिसत होतं. स्वतः तापाने फणफणलेला असतानाही मला भेटायला ...

हृदय कथा: पराधीन आहे जगती

इमेज
3 ऑक्टोबर 2025 - माझ्या जीवनातला अविस्मरणीय दिवस. आयुष्यातल्या जीवनाचं महत्त्व मनावर ठसवणारा दिवस.  मला सौम्य (?)  हृदयविकाराचा झटका आला आणि माझे स्वतःबद्दलचे सगळे अहंगंडाचे, चिरंजीवत्त्वाचे, स्वप्नांचे भ्रम एका झटक्यात धुळीला मिळवून खाडकन मला वास्तवाच्या दुनियेत घेऊन आला.  पहाटे तीन ते दुपारी साडेबारापर्यंतचा काळ हा असा काळ होता जेव्हा मी माझ्या 46 वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदा वर्तमानात जगत होतो.  एक  एक गोष्ट  टिपत होतो.  एक एक एक हृदयाचा ठोका अनुभवत होतो.  तरुण पोरांना आव्हान  देत, दुनिया हिला देंगे हम च्या थाटात तीन चार तास बेधुंद होऊन नाचू शकणार मी, I.C.U. मधल्या बिछान्यावर पापणी हलवली तरी हृदयाचा ठोका बंद पडेल या विचाराने अगदी निश्चल पडून होतो. स्वतःला घराचा पोशिंदा समजणारा मी, रंगमंचावर विविध व्यक्तीरेखांसाठी आपल्या शारीरिक अंगांचा अगदी सहजगत्या ताबा घेऊ शकणारा नट (?), बऱ्यापैकी मॅरेथॉन धावू शकणारा मी, स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार समजणारा मी, कर्तुत्ववान मी, आज हगण्या-मुतण्यासाठी इस्पितळातील स्वच्छता कर्मचाऱ्यांवर आणि आयुष्याच्या पुढ...

द्वंद्व - एकांत एकटा

इमेज
एकटं असणं सुंदर आहे. गर्दीहून ते मोहक आहे. एकटं असणं दुःख नव्हे तर. आनंदाचं द्योतक आहे.   एकटं असणं म्हणजे..  पूर्णत्वाची मनीषा आहे. एकांताची नशा आहे. जीवनाची जिगीषा आहे. मौनाची ती भाषा आहे.  एकटं असणं म्हणजे..  एक प्रकारची शांती आहे. दुःखाची ती भ्रांती आहे. मनाची विश्रांती आहे  एकटं असण्यातच क्रांती आहे.   वाईट नसतं एकटं असणं... वाईट असतें जाणीव. अज्ञानात सुख मान्य पण आता... कुठून आणू ती नेणीव?  जोडल्या मी सर्व तारा,  पण मी कोणाची सितार नाही. छेडतो तारा नात्यांच्या तरी, पूर्वीचा त्यात झंकार नाही.   सगळ्यांना मी आवडतो खरा त्यास माझा इन्कार नाही. दुःख फक्त ह्याचच की, आता  मजविषयी कुणा तक्रार नाही.  खरं सांगू,  समोर पाहत आता मला त्या  शिखरावरती पोहोचायचंय. त्याचवेळी अजूनही स्वतःला  मित्रांच्या शिरगणतीत मोजायचंय.  पण आता कुणीही मला  त्यांच्यामधे मोजत नाही. कशावरूनही, कधीही कुणीच पूर्वीसारखं टोचत नाही.  इतका बोथट झालो आताशा की,  मी कुणाला बोचत नाही. इतकंच कशाला..आठवणीतही  आठवण म्हणून मी आठवत ...

मनकथा - Connection

इमेज
POV 1 - Bluetooth disconnected.               हिवाळ्यातली शनिवार सकाळ. सकाळचे सात वाजले असतील. तो हातात कॉफीचा मग घेऊन 25 व्या मजल्यावरच्या आपल्या बाल्कनीतून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर पसरलेल्या धुक्याकडे निर्विकारपणे पाहत होता. "धुकं नाही. धुरक." तो स्वतःशीच बोलत होता. "सगळं कसं प्रदूषित. या जंगलाचा रंगही अगदीच उदासवाणा. मग शहराची गोष्टच सोडा. हा सूर्य पण उगवतोच आहे.नुसताच, उगाचच. लोकांना त्याचा ताप होतोय हे कळतच नाही त्याला. नशीब! मला ते कळलं आणि सोडली नोकरी. आज सुटकेचा पहिला दिवस." त्याने उसासा सोडला. त्याची विचाराची तंद्री तुटली आणि त्याचं लक्ष थंड झालेल्या कॉफीकडे गेले. "अगदी माझ्या आयुष्यासारखी, थंड." स्वतःशीच कुत्सितपणे हसत म्हणाला आणि वळून घरात डोकावला.             घर तसं निपचितच पडलं होतं. बाहेरच्या झाडांच्या हिडीस सावल्या अचकट विचकट दात दाखवत त्याच्यावर हसत आहेत, असं वाटलं त्याला. काय करावं सुचेना. टीव्ही नव्हता, पुस्तकं नव्हती. होत्या त्या, पांढऱ्याफट...

सृजनशील विस्मृती

इमेज
                        ऑनलाइन काहीसं शोधत असताना शैलप्रिया नावाच्या एका कवयित्रीची 'विस्मृती' नावाची कविता माझ्या वाचनात आली. कविता छान होती तरी कवितेच्या शीर्षकाने माझे लक्ष अधिक वेधलं आणि मी लेखणी हातात घेतली. विस्मृती... चांगली की वाईट? या प्रश्नाचं एक सरळ साधं उत्तर म्हणजे, दुःखद गोष्टींची विस्मृती चांगली आणि सुखद गोष्टींची वाईट. पण हे इतकं साधं सरळ नाही बरंका! अर्थात इथे मी मानसिक स्तरावरच्या स्मृतीविषयी बोलतो आहे. बाकी, आपल्या दैनंदिन जगण्याकरता गरजेच्या सवयी, कौशल्य, ठिकाण, माणसे आणि त्यांच्याशी असलेले नाते या सर्वांची स्मृती आवश्यकच आहे आणि हे तिचे कार्य अगदी विनासायास, ताणरहितपणे सुरूच असते. मी बोलतो आहे ते भावनिक स्मृतींविषयी.                     स्मृ या धातूपासून स्मृती या शब्दाची उत्पत्ती झाली खरी. पण, मला मात्र मृत या संस्कृत शब्दातून/धातूतूनच स्मृती या शब्दाची उत्पत्ती झाली असावी असे वाटते. जे घडून गेले आहे, जे आत्ता अस्तित्वात नाही त्या गोष्टींचा, आपल्या अनु...

मनकथा - कंटाळावे परी, उत्साहरुपे उरावे.

इमेज
                                    दुपारची शांत वेळ. जेवून मी माझ्या बेडरूममध्ये ढीम्म बसलो होतो. काहीही कारण नसताना दोन आठवडे होऊन गेले तरी लेखाचा एकही शब्द मी लिहिला नव्हता. एवढेच नव्हे तर माझी प्रात्यक्षिक परीक्षा (Practical exam) शनिवारी आठ तारखेला आहे; हे दीड महिना आधीपासून ठाऊक असूनही मी पुस्तकाला स्पर्श केला नव्हता. या विनाकारण आलेल्या असाहाय्यतेने मी थकून गेलो होतो. कंटाळलो होतो. "या कंटाळ्याचा पण कंटाळा आलाय.." असं म्हणत मी हतबलतेने डोळे मिटले.                अचानक कसल्याशा आवाजाने माझी तंद्री भंगली. माझ्यासमोर खुर्चीवर एक इसम बसला होता. त्याचा चेहरा निस्तेज होता. किंचित औदासिन्याकडे झुकणारी कळा त्याच्या तोंडभर पसरली होती. एक तणाव त्याच्या व्यक्तिमत्त्वातून झिरपत होता. आणि त्याचे डोळे.... ते बर्फासारखे थंड होते. मी त्याला निरखून पाहिलं मात्र, तो अगदी माझ्यासारखा दिसत होता. Ditto. माझंच प्रतिबिंब. पण काहीसं उपेक्षिले गेलेले. मी त्याला धीर करून व...

मला वृद्ध व्हायचंय.

इमेज
                                    ज्या वयात प्रश्न पडायचे (म्हणजे बालपण), त्या वयाला कधीच मागे टाकून ज्या वयात प्रश्न उभे राहतात त्या वयात (म्हणजे मध्यमवयीन वयात) मी माझं व्यवस्थित बस्तान मांडून निवांत झाल्यावर एक जुनाच प्रश्न स्वतःला विचारला. तुला कोण व्हायचंय, बालक, तरुण की वृद्ध? आणि आतून उत्तर आलं..मला वृद्ध व्हायचंय. गोंधळात ना? मला खरंच वृद्ध व्हायचंय. पण, वृद्ध म्हणजे म्हातारा नवे बरंका!          नाही कळलं? चला, मग जरा सविस्तर सांगतो. उत्क्रांतीवादातील प्रसिद्ध वाक्प्रचार आहे, Survival of the fittest. शरीर कमकुवत होऊन त्याचा अंत होणे म्हणजे म्हातारपण. पण त्याबरोबरच ऊर्जेचा एक नियम आहे. ऊर्जा कधीही नष्ट होत नाही तर, ती रूपांतरित (Transform) होते. अगदी तसंच आयुष्यभराच्या अनुभवाचं सुदृढ व्यक्तिमत्त्वात आणि सकस ज्ञानात ट्रान्सफॉर्मेशन होणं म्हणजे वृद्धत्व .           महत्त्वाचं हे आहे की, मनाने आपण काय निवडतो म्हातारपण की वृद्धत्...

उगाच थोडसं काव्यात्मक

इमेज
सकाळ  प्रत्येक सकाळ उत्साहाची,  सजलेली एक मैफल असते. अशा प्रत्येक सकाळीला,  शांत नीरवपहाटेची बैठक असते. पहिल्या किरणात सूर्याच्या,  चैतन्य प्रकाश दरवळतो. प्रत्येक पाना फुलांमध्ये हळूच,  पहाटदव विरघळतो. आभाळ  तू बसशील जेव्हा फांदीवर,  तुझ्यासोबत बसणारच आहे. तू जाशील सोडून तेव्हा,तुझ्यावर मी रुसणारच आहे. तरी, पिंजरा नाही हं, माझं प्रेम.  आभाळ आहे,असणारच आहे. तू उडशील तेव्हा ते दिसेल निरभ्र,  तू जाशील दूर तेव्हा ते बरसणारच आहे. मागे वळून पाहताना वर्षा मागून वर्षे पटकन झटकन निघून जातात. आठवणी अधूनमधून, क्रूरपणे छळून जातात.   बाल्य व तारुण्य दोघे हा हा म्हणता पळून जातात. आणि अचानक एक दिवस.... आपल्याच मुलां मधून आपल्याकडे, मिश्किल पणे हसून पाहतात. क्षणभंगुर मी का अजून तरुण नाही,...

भाषा: शब्दांच्या पलीकडली

इमेज
                       लहानपणापासून मला भाषेचं एक वेगळंच आकर्षण होतं. त्यात हल्ली अधून मधून डोके वर काढणाऱ्या शुद्ध व अशुद्ध भाषा या वादामुळे पुन्हा एकदा माझं लक्ष भाषेकडे वेधलं गेलं. कसं कुणास ठाऊक पण या वादात 'भेटणं' आणि 'मिळणं' या दोन शब्दांच्या वापराला अनन्यसाधारण महत्त्व आलं आणि याच विषयावर अथर्व सुदामेची एक विनोदी, भन्नाट रीळ पाहिली, जिने मला एक वेगळाच दृष्टिकोन दिला... शब्दांकडे, भाषेकडे बघण्याचा. अर्थात, शब्द कुठे आणि कसे वापरायचे, चालवायचे, याचे व्याकरणाचे काही नियम असतात आणि ते पाळलेही पाहिजेत. पण, मला तर वाटतं शब्द चालतात ते त्यांच्या मागच्या भावनांमुळे. व्याकरण तशी अधली मधली गोष्ट. व्याकरणाच्या अल्याड आपण, आपले शब्द आणि पल्याड भावोत्कट भाषा .           अतिशय सामान्य वाटणारे शब्द खूप गहन असतात, असं मला वाटतं. आता भेटणं आणि मिळणं या दोन साध्याच शब्दांचं उदाहरण घ्या ना. मला वाटतं, भेटणं या शब्दातून भेटणाऱ्या दोघांचं, मग ती वस्तू असो वा सजीव, त्यांचे अस्तित्व, त्यांचे स्वत्व ज...

मन की बात

इमेज
                                   नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि मन की बात हे वाक्य सतत कानावर पडू लागलं. पण आजकाल आपण खरंच मन की बात (मनाविषयी..मनातलं नव्हे.) करतो का? आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आपण प्रचंड प्रगती केली आहे. तिची गती इतकी आहे की, वाऱ्यालाही मागे टाकणाऱ्या मनाची ही फार दमछाक होते. कदाचित म्हणूनच वाऱ्याला मनोज म्हणत असतील. अशावेळी, माझ्या मनात आलं की, चलो! आज मन की बात करते है. काय गंमत आहे ना हे देखील मनातच आलं.                    मन आहे म्हणून आपण मानव; हे वाक्य लहानपणापासून घोकून पाठ झाल आहे. पण, खरंतर हे मन इतकं अचंबित करणारे, मती कुंठीत करणारे आहे, याची जाणीव अगदीच सरधोपट झाली आहे. या मनाचं दिव्यत्व, अफाटपण, अथांगपण, इतक्या प्रगतीनंतरही मापता आलेलं नाही, ही केवढी मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, नाही का?               आजपर्यंत आपण मनाचा शोध अगदी अविरत घेत आहोत. कधी कविते...